जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या स्थितीविषयक निराधार व कपोलकल्पित बातम्या प्रसिध्द करणार्या प्रसार माध्यमांवर कारवाई करण्याचा विचार सरकार करीत असल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या व विपर्यस्त बातम्या पसरविणार्यां माध्यमांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की सदर विपर्यस्त वृत्त प्रथम रॉयटर्स वृत्त संस्थेने दिले व ते ‘डॉन’मध्ये प्रसिध्द झाले. त्यात म्हटले आहे की श्रीनगरमध्ये झालेल्या एका निषेध मोर्चात दहा हजार लोकांचा सहभाग होता.
तथापि हे वृत्त साफ खोटे आहे. बारामुल्ला व श्रीनगरमध्ये काही किरकोळ प्रकार घडले आणि त्यात २० पेक्षा अधिक लोक नव्हते.