विनापरवाना प्रचार मिरवणूक; मनोज परबांविरुद्ध गुन्हा दाखल

0
7

तिस्क-उसगाव परिसरात 1 मे रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विनापरवाना प्रचार मिरवणूक काढल्याप्रकरणी आरजीपीचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात फोंडा पोलिसांकडून गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मिरवणुकीसाठी आवश्यक परवाना घेतला नव्हता. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सत्तरीचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी ही तक्रार दाखल केली.