विनयभंग प्रकरणी उसगाव पंचायतीचा सचिव निलंबित

0
1

उसगाव-गांजे ग्रामपंचायत कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या कथित विनयभंग प्रकरणात पंचायत सचिव होनाजी मोरजकर याला काल निलंबित करण्यात आले. पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा निर्देश संबंधितांना देण्यात आला आहे, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.
त्यानंतर काही वेळातच पंचायत संचालनालयाने पंचायत सचिव होनाजी मोरजकर याच्या निलंबनाचा आदेश जारी केला. निलंबित केलेल्या मोरजकर याला फोंडा येथील गटविकास कार्यालयात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे. उसगाव पंचायतीच्या सचिवाने पंचायत कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.