विधानसभेत कोविंद यांचे अभिनंदन

0
123

भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांचे काल गोवा विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडलेल्या या ठरावाला सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनाही पाठिंबा दिला. कोविंद यांनी निवडणुकीआधी गोव्याला भेट देऊन येथील आमदारांशी संवाद साधल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोविंद यांना विधानसभेत धन्यवाद दिले. गोव्यात आले असता कोविंद यांनी सांगितले की, पर्रीकर यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत जो बंगला देण्यात आला होता तो आपल्याला कार्यालयासाठी देण्यात आला होता. गोव्याशी संबंधांचा हा एक धागा असल्याचे कोविंद यांनी आपल्याला सांगितले असे पर्रीकर म्हणाले.