उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने गोवा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्वरी विधानसभा सचिवालयाच्या ५०० मीटर परिसर आणि पणजी पोलीस स्टेशन क्षेत्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
हा जमावबंदीचा आदेश सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून लागू होणार असून विधानसभा अधिवेशन काळापर्यंत लागू राहणार आहे. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.