विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत बैठकीसाठी कॉंग्रेसचे नेते रवाना

0
42

गोव्यासह, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड व मणिपूर ह्या पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवडणूकविषयक डावपेच ठरवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला हजेरी लावण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिल्लीला प्रयाण केले.

या बैठकीत सोनिया गांधी यांनी २०२२ साली ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या राज्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांनी एकत्रितपणे राहून शिस्तबद्धरित्या पक्षासाठी काम करावे, असा सल्ला दिला. यावेळी पक्ष सदस्य नोंदणीसाठीच्या कार्यक्रमाचीही सविस्तर आखणी करण्यात आली. पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे व ती ३१ मार्चपर्यंत चालू राहील.