विधानसभा निवडणुका एकत्रित नाहीत

0
86

यंदा होणार्‍या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित न घेता वेगवेगळ्या घेण्यात येणार असल्याचे कळते. महाराष्ट्र व हरयाणाच्या निवडणुका आधी ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी तर जम्मू काश्मीर व झारखंडच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीत घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र व हरयाणासाठी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. विशेषकरून झारखंड व जम्मू काश्मीरमधील अनुक्रम माओवाद व दहशतवादाची समस्या असल्याचे जादा निमलष्करी दलाची आवश्यकता भासणार असून त्यामुळेच चारही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार नाहीत.