विद्युतभारित वीजवाहिनी तुटून अंगावर पडल्याने रामनाथ भट या (२२) वर्षीय तरुणाचे निधन झाले. सदर घटना जांबावली येथील देवस्थान परिसरात घडली. रामनाथ भट हा शिर्शी (कर्नाटक) येथील असून काणकोण येथील पर्तगाळ मठात त्याचे वास्तव होते. जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानात अनुष्ठान पूर्तीसाठी गेल्या बुधवारपासून तो जांबावली येथे आला होता. पूजा आटोपून आपल्या खोलीकडे जात असताना त्याच्यावर विद्युतभारित वीज वाहिनी पडली व तेथेच त्याचे निधन झाले. केपेचे उपअधीक्षक सुभाष गोलतेकर, निरीक्षक राजू राऊत देसाई, प्रवीण गांवस या प्रकरणी तपास करीत आहेत.