तामीळनाडूतील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने वजनाने सर्वांत हलका उपग्रह बनविला असून एस. रियासुद्दिन नामक सदर विद्यार्थ्याला ‘नासा’ ने निमंत्रित केले आहे. ‘शास्त्रा विद्यापीठा’ चा तो द्वितीय वर्ष मॅकॅट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे.
स्पेस ग्लोबल डिझाईन स्पर्धेत त्याला पारितोषिक मिळाले आहे. ३० ग्रॅम वजन वाहून नेऊ शकणारा जगातील सर्वांत हलका उपग्रह त्याने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला आहे. तामीळनाडूच्या तंजावुरमधल्या करंथाईचा तो रहिवासी आहे.