विद्यार्थ्यांना आता‘पीईएन’

0
12

राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कायम शिक्षण क्रमांक (पीईएन) दिला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काल दिली. नवी दिल्ली येथील शिक्षण विभागाने वर्ष 2022-23 पासून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी एक ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली आहे. या व्यवस्थेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला पीईएन दिला जात आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित शिक्षण संस्था, खास विद्यालयातील विद्यार्थ्यांना पीईएन दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कायम शिक्षण क्रमांक नोंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.