विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणी संशयितास कोठडी

0
6

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केलेल्या सीताराम लक्ष्मीकांत गावकर याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फोंडा पोलिसांनी संशयिताविरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. फोंडा परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विध्यार्थिनीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी फोंडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सीताराम गावकरला अल्पवयीन विद्यार्थिनीसह ताब्यात घेतले होते.