विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणी संशयितास अटक

0
2

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण केल्याप्रकरणी सीताराम लक्ष्मीकांत गावकर (40, रा. मापा-पंचवाडी) याला गुरुवारी सकाळी फोंडा पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी संशयिताने अल्पवयीन विद्यार्थिनीचेे अपहरण केले होते. तिच्या वडिलांनी बुधवारी रात्री तक्रार दिल्यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. संशयित तिला कर्नाटकात नेत असताना त्याला सांगेतील तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास सदर विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली होती. बुधवारी रात्री सांगे भागात असलेल्या तपासणी नाक्यावर संशयित अल्पवयीन मुलीला नेत असताना तो पोलिसांच्या तावडीत
सापडला. गुरुवारी सकाळी गुन्हा नोंदवल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. सीताराम गावकर हा वीज खात्यात रोजंदारीवर काम करीत होता.