गावागावात आयोजित करण्यात येणार्या विक्री प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या मालाची विक्री करणार्या विक्रेत्यांना यापुढे सेवा कर भरणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार रोहन खंवटे यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. वाहतूक कंपन्या व कुरियर कंपन्यांनाही सेवा कराच्या कक्षेत आणण्यात येईल, असे यावेळी पुढे बोलताना त्यानी स्पष्ट केले. वरील कंपन्यांना सरकार दरबारी नोंदणी करावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही विक्रेते रस्त्याच्या बाजूला शेतीत माल ठेवून विक्री करत असतात त्यांनाही सेवा कर भरावा लागेल, असे पर्रीकर यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार रोहन खंवटे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. ३१ मार्च २०१४ पर्यंत वाणिज्य कर खात्याकडे नोंदणी झालेल्या डिलर्सचा आंकडा किती आहे, असा प्रश्ना खंवटे यांनी यावेळी विचारला होता. यावेळी बोलताना पर्रीकर यांनी नोंदणी झालेले ६५ हजार डिलर्स आहेत अशी माहिती दिली. यावेळी हस्तक्षेप करताना दिगंबर कामत म्हणाले की सगळे डिलर्स सेवा कर भरत असतात. मात्र, आता गावागावात विक्री प्रदर्शने होत असतात. पण ते कोणताही कर भरत नाहीत. यावेळी बोलताना पर्रीकर म्हणाले की त्यांना सेवा कर भरणे सक्तीचे करण्यात येईल. मात्र अशा प्रदर्शनात छोट्या छोट्या स्वयंसेवा गटाचीही दालने असतात. प्रदर्शनातील दुकांनाना सेवा कर लागू केल्यानंतर या स्वयंसेवी गटांना कशी सूट देता येईल हा प्रश्न उभा राहणार असल्याचे ते म्हणाले.