विक्रांत विमानवाहू नौका नौदलासाठी सज्ज

0
108

भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ काल बुधवारपासून समुद्रातील विविध चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. भारताला १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ऐतिहासिक विजय मिळवून देणार्‍या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या नावावरूनच भारतीय नौदलाने स्वबळावर बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला व्ही फॉर व्हीक्टरीची सुरवात करणार्‍या विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचेच नाव पुन्हा एकदा देण्यात आले आहे.

विक्रांत विमानवाहू युद्धनौका तिच्या पहिल्या सागरी चाचण्यांसाठी सज्ज झाली असून हा भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस आहे. आतापर्यंतची सर्वात गुंतागुंतीची आणि सर्वात मोठी युद्धनौका भारतात तयार करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेल्या या विमानवाहू युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचा आता मोजक्याच बलाढ्य देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. भारतीय नौदलात सध्या आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका देशाच्या समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात आहे. पुढील ३ वर्षात सर्व समुद्रातील विविध चाचण्या पूर्ण करून विक्रांतही भारतीय नौदालाची सेवा करण्यासाठी सज्ज होईल.

ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रात कारवारजवळ तैनात करण्यात आली आहे.