विकासासाठी प्रत्येकाचे योगदान हवे

0
68
कीर्लपाल दाभाळ येथे पंचायत इमारतीची पायाभरणी करताना मंत्री माविन गुदिन्हो. सोबत मान्यवर.

सावर्डे (न. प्र.)
गोव्याच्या विकासासाठी प्रत्येक माणसाने आपले योगदान दिल्यास साधन सुविधांनी युक्त तसेच व स्वप्नातील गोवा पाहण्यास मिळणार असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आंबेउदक येथे केले. येथे नवीन बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या पायाभरणी सभारंभावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम आंबेउदक येथील साईबाबा मंदिरात झाला.
यावेळी व्यासपीठावर सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर, सरपंच संदीप पाऊसकर, कायेचेचे सरपंच किशोर देसाई, सावर्डेचे उपसरपंच सुमित्रा नाईक, पंच उल्हास नाईक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री काब्राल यांनी पुढे सांगितले की, गोव्याच्या विकासकामाचा प्रश्‍नी जमिनीचा ना हरकत दाखला दिल्यास त्या बदल्यात सरकार जमीन मालकांना त्याची किंमत देते. तरीदेखील काही जमीन मालक आपल्या जमिनी विकासकामासाठी देताना मागे पुढे करतात. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. २४ तास वीजपुरवठा करणे हे आपले स्वप्न असून त्यासाठी साधनसुविधा पहिल्यांदा पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सावर्डेत ४५ कोटींची विकासकामे
सावर्डे मतदारसंघात दसर्‍याच्या मुहूर्तावर ४५ कोटी रूपयांचा विकासकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार दीपक पाऊसकर, साकोर्डाचे सरपंच नहा कापेकर, उपसरपंच उज्वला गावकर, पंच शिरीष देसाई, जीतेंद्र नाईक उपस्थित होते. त्यानंतर कुपे येथे सुमारे ५ कोटी खर्चून ग्रामीण आरोग्य केंदाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, कुपेचे सरपंच गंगाराम लांबोर तसेच पंच सदस्य उपस्थित होते. आंबेउदक ते काये या गावात कित्येक वर्षांपासून रस्त्याची मागणी होती ती मागणी आज पाऊसकर यांनी नवीन रस्त्याची पायाभरणी करून पूर्ण केली. त्यांच्या सोबत इडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर, सरपंच किशोर देसाई, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर तसेच पंच सदस्य उपस्थित होते.
कीर्लपाल-दाभाळ येथे
पंचायत इमारतीची पायाभरणी
कीर्लपाल दाभाळ पंचायतीच्या नवीन इमारतीची पायाभरणी यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार दीपक पाऊसकर, सरपंच शकुंतला गावकर, उपसरपंच रजनीकांत गावकर तसेच पंच सदस्य उपस्थित होते. काये पंचायतीच्या इमारतीचे नुतनीकरण पायाभरणी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक पाऊसकर, पंचायत संचालक अजित पंचवाडकर, सरपंच किशोर देसाई तसेच पंच सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक पाऊसकर यांनी, लोकांनी देवापेक्षा विश्‍वासाला आपण पात्र होण्याचे प्रयत्न करणार आहे. सावर्डे मतदारसंघात वीज, पाणी, रस्ते, मैदान तसेच मतदारसंघातील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी आपण प्रयत्न करीत आहे. खाण प्रश्‍न या सावर्डे भागातच जास्त भेडसावत असून येत्या काही दिवसात खाण प्रश्‍न सोडवण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर कायसे ते गुडेमळ येथील बगल रस्त्याचे कामही लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
सावर्डेे येथे नवीन मैदानाची पायाभरणी, सावर्डेे तिस्क सर्कल ते कापसे येथे रस्त्याच्या सुुशोभिकरणाचे उद्घाटन यावेळी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. गोवा साधन सुविधा मंडळामार्फत सुमारे ४५ कोटी रूपयांच्या कामाची पायाभरणी सावर्डे मतदारसंघात करण्यात आली.