केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेखालील विकसित कृषी अभियानाचा आज (दि. 29) दिल्लीत शुभारंभ होत असून त्यानिमित्त गोव्यातही विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. विकसित कृषी अभियानानिमित्त उत्तर व दक्षिण गोव्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृषी वैज्ञानिक राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळी वाहने उत्तर व दक्षिण गोव्यात पाठवली जाणार असून, भातशेतीची बियाणे व अन्य बाबतीत हे कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवी दिल्लीत कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत.