विंडीजविरुद्ध भारताची सावध सुरुवात

0
126

>> मयंक अगरवालचे अर्धशतक

>> जेसन होल्डरचा प्रभावी मारा

>> रविचंद्रन अश्‍विन संघाबाहेरच

वजनदार कॉर्नवॉलचे कसोटी पदार्पण
वेस्ट इंडीजने काल १४० किलो वजनी अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल याला कसोटी पदार्पणाची संधी दिली. २६ वर्षीय कॉर्नवॉल जगातील सर्वांत वजनदार कसोटीपटू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्रॉंग (१३३ ते १३९ किलो) याला मागे टाकले. कॉर्नवॉलने पहिल्या सत्रात चेतेश्‍वर पुजाराचा बळी घेत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे खाते उघडले. तत्पूर्वी, लोकेश राहुलचा स्लीपमध्ये झेल घेत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला झेल देखील घेतला.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये लीवर्ड आयलंडकडून खेळताना ५५ सामन्यांत २६० बळींची नोंद त्याच्या नावावर आहे. त्याने फलंदाजीत २२२४ धावादेखील केल्या आहेत.

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याला कालपासून सुरुवात झाली. विंडीजचा कर्णधार होल्डरने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले.

अंतिम वृत्त हाती आले तेव्हा भारताने ५१ षटकांत ३ बाद १३६ धावा केल्या होत्या. विराट कोहली ४१ धावांवर खेळत होते तर अजिंक्य रहाणेने दहा धावा केल्या होत्या.
लोकेश राहुल व मयंक अगरवाल ही जोडी भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरली. राहुल केवळ १३ धावा करू शकला. तिसर्‍या क्रमांकावरील पुजाराचा खराब फॉर्म कायम राहिला. पदार्पणवीर कॉर्नवॉल याने पुजाराला तंबूचा रस्ता दाखवला. मयंक अगरवालने आपले तिसरे कसोटी अर्धशतक झळकावताना ५५ धावांची खेळी केली. होल्डरने त्याला तंबूची वाट दाखवली.

वेस्ट इंडीजने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना मिगेल कमिन्सच्या जागी रहकीम कॉर्नवॉलला संधी दिली तर शेय होप जायबंदी झाल्याने जहामार हॅमिल्टनचा संघात समावेश करावा लागला. भारत पहिला डाव ः लोकेश राहुल झे. कॉर्नवॉल गो. होल्डर १३, मयंक अगरवाल झे. कॉर्नवॉल गो. होल्डर ५५, चेतेश्‍वर पुजारा झे. ब्रूक्स गो. कॉर्नवॉल ६, विराट कोहली नाबाद ३०, अजिंक्य रहाणे नाबाद ०, अवांतर ११ एकूण ५१ षटकांत ३ बाद ११५
गोलंदाजी ः किमार रोच ११-४-२२-०, शेन्नन गेब्रियल ६-०-३१-०, जेसन होल्डर १५-५-२६-२, रहकीम कॉर्नवॉल १६-५-४०-१, रॉस्टन चेज २-०-६-०.