गोवा सरकारने 6 महिन्यांसाठी वाहतूक सेवांवर एस्मा लागू केला आहे. कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी दिलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा एस्मा लागू करण्यात आला आहे. गोवा सरकारने एक अधिसूचना काल जारी केली आहे. त्यामध्ये राज्यातील जमीन किंवा जलमार्गे प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी असलेल्या सर्व वाहतूक सेवांमध्ये संपावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (ईएसएमए), 1988 अंतर्गत जारी केलेला हा आदेश सहा महिन्यांसाठी लागू राहील. अखंड वाहतूक सेवा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक हितासाठी हा निर्णय घेतला आहे.