वाहतूक संचालकांविरोधात बेपत्ता असल्याची तक्रार

0
2

अखिल गोवा बसमालक संघटनेचे नेते सुदिप ताम्हणकर यांनी वाहतूक खात्याच्या संचालकाविरोधात पणजी पोलीस स्थानकात काल तक्रार नोंदविली असून त्यात खात्याचे संचालक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. संचालक परिमल अभिषेक गेल्या महिन्याभरापासून सुट्टीवर असून ते आपल्या सुट्टीमध्ये वारंवार वाढ करीत असल्याने नागरिकांची वाहतूक खात्याच्या कार्यालयातील कामे तुंबून पडली आहेत. संचालकांनी चारवेळा कार्यालयात येण्याचे आश्वासन देऊनसुध्दा कार्यालयात आला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. संचालकांनी 3 ऑक्टोबरला कार्यालयात येणार असल्याचे म्हटले होते. तथापि, ते न आल्याने अखेर तक्रार नोंदवल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.