वाहतूक नियमांचे वास्कोत उल्लंघन

0
13

वास्को शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. शहरातील एफ. एल. गोम्स व स्वतंत्र पथ मार्गावर वाहन पार्किंग दिशा फलक असताना सुद्धा वाहनचालक मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करीत आहेत. तसेच शहरातील रस्त्यावर रेंट अ बाईक व कार व्यवसाय वाहने एकाच ठिकाणी पार्क करीत असल्याने इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. वास्कोत वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक व पादचारी करीत आहेत. एफ. एल. गोम्स रस्त्यावरून शहरात येताना बेविट फार्मसी कॉलेज इमारतीच्या बाजूस रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क करून शहरात येणाऱ्या कदंब बसेस, इंधन टँकर बरोबर इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.