>> मंत्री माविन गुदिन्हो
जनतेने वाहतूक नियमांचे पालन केल्यास त्यांना दंड भरावा लागणार नाही, असे विद्यमान मंत्री तथा मावळते वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवीन वाहतूक कायद्याविषयी ते बोलत होते.
राज्य सरकारकडून नवीन वाहतूक कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून केली जाणार आहे. सुधारीत नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम दहापट भरावी लागणार असल्याने विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मॉनिटरींग समितीने नवीन वाहतूक नियम उल्लंघन दंडाची राज्यात अंमलबजावणी केली जात नसल्याने नापसंती व्यक्त करून नवीन वाहतूक दंडाची अंमलबजावणी न केल्यास केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून निधी रोखण्याचा इशारा दिल्याने मागील सरकारच्या कार्यकाळात नवीन सुधारीत वाहतूक नियमभंग दंडाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.