वाहतूक खात्यात कॅशलेस व्यवहार सुरू करा : आप

0
65

राज्यातील वाहतूक खात्यात काळा पैसा पांढरा करण्याचे कारस्थान चालू असून या पार्श्‍वभूमीवर सरकारने वाहतूक खात्यातील सर्व व्यवहार कॅशलेस पध्दतीने करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. वाहतूक खात्यात जे लोक कर भरायला अथवा अन्य प्रकारचा भरणा करण्यासाठी येतात त्यांच्याकडून धनादेश स्वीकारले जावेत, अशी मागणी पक्षाचे एक उमेदवार सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत केली. वाहतूक अधिकार्‍याच्या बँकेत नोकरी करणार्‍या पत्नीला अशाचप्रकारे ३५ लाख रु. एवढा काळा पैसा पांढरा करून देताना पकडण्यात आले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.