वास्को समुद्रात ट्रॉलर उलटून दोघे बुडाले

0
148
वास्को समुद्रात मच्छिमारी ट्रॉलर बुडाल्यानंतर त्यातील बेपत्ता खलाशांचा शोध घेण्याचे काम चालू असताना किनार्‍यावर जमलेले लोक (छाया : प्रदीप नाईक)

चार कामगार सुखरुप बचावले
मच्छिमारी हंगामास प्रारंभ झाल्या दिवशीच खोल समुद्रात उतरलेले वास्को खारिवाडा येथील फ्रांसिस डिसोझा (४१) या ट्रॉलर मालकाला आपला जीव गमवावा लागला. सडा येथील जपानीज गार्डन जवळील समुद्रात मच्छीमारी ट्रॉलर बुडाल्याने ट्रॉलरमालकासह एक कामगार समुद्रात बुडून बेपत्ता झाले. अन्य चार कामगार सुखरूप बचावले.
काल (दि. १) मच्छीमारी बंदी उठविल्याने खारीवाड्यातील ट्रॉलर खोल समुद्रात जात असताना पहाटे सहा वाजता फ्रांसिस डिसोझा यांच्या मालकीचा ‘मारीया रोझ’ नामक ट्रॉलर मासेमारीसाठी जाताना सडा भागातील जपानीज गार्डन लगत बुडाला.
या ट्रॉलवर मालकांसह एकूण ५ कामगार होते. ट्रॉलर मालक फ्रांसिस डिसोझा स्वत: ट्रॉलर चावीत होते. त्यांच्यासोबत जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील हरीश्‍चंद्र उर्फ पप्पू हा कामगार होता. तर अन्य चार कामगार हेराडिया बिंदा (३६ वर्षे- उत्तर प्रदेश), अब्दुल कादर अली (५० वर्षे, कुमठा), सुलेमान गांजी (४८ वर्षे, कुमठा) आणि इस्माईल अबूबाकर (४६ वर्षे, कुमठा), ट्रॉलरच्या काठावर बसले होते. अचानक भली मोठी लाट सदर ट्रॉलवर आदळल्याने काठावर बसलेले चारजण पाण्यात फेकले गेले व ट्रॉलर समुद्रात फेकल्या गेलेल्या चार कामगारांपैकी कुमठा येथील तिघांनी पोहून किनारा गाठला. तर जैनपूर- उत्तरप्रदेश येथील हेरेडिया बिंद हा पाण्यात गटांगळ्या खात असताना नौदलाच्या हेलीकॉप्टरने त्याला वाचविले. अशा तर्‍हेने या चौघांचे प्राण वाचले.
फ्रांसिस डिसोझा यांच्या ट्रॉलर व्यतिरिक्त त्यांच्या पुढे खारीवाड्यातील अन्य सहा ट्रॉलर होते, तर मागे आणखी दोन ट्रॉलर होते. त्यांनी फ्रांसिसचा उलटलेला ट्रॉलर पाहून पोलीसांना माहिती दिली.
तटरक्षकाच्या बोटी आणि नौदलाच्या हेलीकॉप्टरने ट्रॉलरचा शोध घेण्यास प्रारंभ केला. त्यावेळी हेरेडिया बिंद पाण्यात गटांगळ्या खाताना दृष्टीस पडला. लागलीच त्याला पाण्यातून वर काढून बायणा समुद्र किनारी आणल्यावर उपचारासाठी तातडीने गोमेकॉमध्ये नेले. अन्य तीन कामगार पोहून आल्यावर ङ्गश्यामांचे भाटफ येथे खडकाला धरून बसलेले आढळले. त्यांना तेथून सुखरूप सुरक्षितरित्या किनार्‍यावर आणले.ट्रॉलरवरील मालक व अन्य एक कामगार आत राहिल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही व ते ट्रॉलरसह खोल समुद्रात बुडाले.