वास्कोत ट्रक आणि कारच्या धडकेत एक जखमी

0
64

वास्को (न. प्र.)
आल्त, दाबोळी येथे वालीस गॅरेज तसेच नौदल शस्त्रागार भंडारा जवळील राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या वाहतूक बेटाजवळ ट्रक आणि कार यामध्ये टक्कर होऊन एक जखमी तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
येथील वालीस गॅरेज जवळील तसेच नौदल शस्त्रागार भंडारा जवळील नव्यानेच बांधलेले ते वाहूतक बेट दिवसेंदिवस प्राणघातक ठरत असून येथे अपघात संख्येत वाढ झाली आहे. तसेच झुआरीनगरहून दाबोळीच्या दिशेने येणारी वाहने सिग्नल मोडून कायद्याचे उल्लंघन करत असल्याने येथील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत असल्याच्या अनेक तक्रारी लोकांकडून येत आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान हे वाहतूक बेट तसेच सिग्नलमुळे गोंधळ उडाल्याने झुआरीनगरहून दाबोळीच्या दिशेने येणारा ट्रक (केए २२ डी-०४५२) व या वाहतूक बेटाला वळसा घालून जयराम नगरला जाणार्‍या एका मारुती कार (क्र. जीए ०६ ए २३३६) यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली. यात मारुती कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व चालक जखमी झाला. सुदैवाने किरकोळ जखमांवर निभावले.
दरम्यान, अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या या वाहतूक बेटाजवळ अपघाताचे प्रमाण वाढत असून हे वाहतूक बेट तसेच सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहे.