ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका गुरुवारीदेखील कायम राहिली. पुरुष एकेरीत नववा मानांकित स्टॅन वावरिंका, सातवा मानांकित डेव्हिड गॉफिन यांच्यासह सॅम क्वेरी (१३) यांना दुसर्या फेरीतील पराजयासह स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. महिला एकेरीत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळालेल्या स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ‘पॅकअप’ करावे लागले.
जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या टेनिज सँडग्रेन याने स्वित्झर्लंडच्या वावरिंका याला केवळ एक तास २८ मिनिटांत ६-२, ६-१, ६-४ असे हरवून तिसरी फेरी गाठली. तिसर्या फेरीत सँडग्रेनचा सामना मॅक्सिमिलियन याच्याशी होणार आहे. डेव्हिड गॉफिन याने मात्र दोन तास ५४ मिनिटे झुंज दिल्यानंतर शरणागती पत्करली. फ्रान्सच्या ज्युलियन बेनेट्यू याने गॉफिनला १-६, ७-६, ६-१, ७-६ असे हरविले. आघाडीचे खेळाडू स्पर्धेबाहेर होत असताना द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने मात्र विजयी दौड कायम ठेवली. जर्मनीच्या जान लेनार्ड स्ट्रफ याला ६-४, ६-४, ७-६ असे सरळ तीन सेटमध्ये नमवून फेडररने रिचर्ड गास्केट याच्याशी गाठ पक्की केली. महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हालेपने युजिन बुचार्डचा ६-२, ६-२ असा फडशा पाडत आपल्या भन्नाट फॉर्मची प्रचिती दिली. तैवानच्या सेय सु वेई हिने महिला एकेरीतील आत्तापर्यंतचा धक्कादायक निकाल नोंदविताना स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला ७-६, ६-४ असे स्पर्धेबाहेर फेकले.
अन्य मानांकित खेळाडूंचे निकाल
पुरुष एकेरी ः दुसरी फेरी ः आलेक्झांडर झ्वेरेव (४) वि. वि. पीटर गोजोविच ६-१, ६-३, ४-६, ६-३, रिचर्ड गास्केट (२९) वि. वि. लॉरेन्झो सोनेगो ६-२, ६-२, ६-३, युआन मार्टिन डेल पोत्रो (१२) वि. वि. कारेन खाचानोव ६-४, ७-६, ६-७, ६-४, नोवाक जोकोविच (१४) वि. वि. गाईल मोनफिल्स ४-६, ६-३, ६-१, ६-३, फाबियो फोगनिनी (२५) वि. वि. इव्हेजनी डॉनस्कॉय २-६, ६-३, ६-४, ६-१, ऍड्रियन मन्नारिनो (२६) वि. वि. जिरी वेस्ली ६-३, ७-६, ५-७, ६-३, टॉमस बर्डिच (१९) वि. वि. गुलेर्मो गार्सिया लोपेझ ६-३, २-६, ६-२, ६-३, अल्बर्ट रामोस विनोलास (२१) वि. वि. टिम स्मायझेक ६-४, ६-२, ७-६, सॅम क्वेरी (१३) पराभूत वि. मार्टन फुकसोविच ४-६, ६-७, ६-४, २-६, डॉमनिक थिएम (५) वि. वि. डेनिस कुडला ६-७, ३-६, ६-३, ६-२, ६-३.
महिला एकेरी ः दुसरी फेरी ः ऍश्ले बार्टी (१८) वि. वि. कामिला जॉर्जी ५-७, ६-४, ६-१, इलिना वेस्निना (१६) पराभूत वि. नाओमी ओसाका ६-७, २-६, मॅडिसन कीज (१७) वि. वि. इकतेरिना आलेक्झांड्रोवा ६-०, ६-१, अँजेलिक कर्बर (२१) वि. वि. डॉना वेकिच ६-४, ६-१, लुसी साफारोवा (२९) वि. वि. सोराना सर्स्टिया ६-२, ६-४, कॅरोलिना प्लिस्कोवा (६) वि. वि. बिट्रीझ हड्डा माया ६-१, ६-१, मिराना लुसी बरोनी (२८) पराभूत वि. आलेक्झांड्रा सासनोविच ३-६, १-६, ऍग्निएस्का रादवांस्का (२६) वि. वि. लेसिया सुरेंको २-६, ७-५, ६-३, अनास्तासिया सेवास्तोवा (१४) पराभूत वि. मारिया शारापोवा १-६, ६-७, बार्बरा स्ट्रायकोवा (२०) वि. वि. लारा अरुआबारेना ६-३, ६-४, कॅरोलिन गार्सिया (८) वि. वि. मार्केटा वोंदरुसोवा ६-७, ६-२, ८-६, योहाना कोंटा (९) पराभूत वि. बर्नार्डा पेरा ४-६, ५-७