वाळू उत्खनन अर्जांसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत

0
4

खाण संचालनालयाने मांडवी व झुआरी या नद्यांतून स्थानिक लोकांना वाळू उत्खनन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवली असून, आता येत्या 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांना त्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे कळवले आहे. ऑनलाईन अर्जांसाठीची एसओपी तसेच विभाग आरेखन नकाशे व अन्य माहितीसाठी इच्छुकांनी खाण खात्याच्या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे कळवले आहे.