वाळपईत बस अपघातात २९ जखमीं

0
135
डिचोली - वाळपई मार्गावरील अपघातग्रस्त बस (छाया : दशरथ मांद्रेकर)

जखमीत विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश
वाळपई-सत्तरी येथे नुहा पेट्रोल पंपजवळ झालेल्या प्रवासी बस अपघातात शाळकरी मुले व शिक्षक मिळून २९ जण जखमी झाले. अपघात सकाळी ७.३० वा. घडला. जीए ०४ टी २६२२ या क्रमांकाची दीप साई ही प्रवासी बस सकाळी डिचोलीहून वाळपई येथे येत असताना नागवे जंक्शनवर चालकाचा ताबा सुटला व बसची धडक झाडाला बसली. सुदैवाने दुसर्‍या झाडाला गाडी अडकून पडल्यामुळे ती पुढे गेली नाही. केबिनमध्ये सुध्दा प्रवासी बसले होते, पण त्यातील प्रवाशांना किरकोळ मार लागला.काल पहाटेपासून वाळपई परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे अपघाताला जणू निमंत्रण मिळाले. त्यानंतर जखमीना वाळपई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यातील अनेकाना प्राथमिक उपचार करून घरी जाऊ दिले गेले. त्या प्रवाशी बसमध्ये श्री हनुमान विद्यालयातील तसेच अवरलेडी हायस्कुल मधील मुले व शिक्षक नियमित येत होते. त्यात दैव बलवत्तर म्हणून मोठा अपघात होऊन सुध्दा किरकोळ जखमावर निभावले.जखमीत रसिका गांवकर वय ३२ होंडा, रजनी कुडसकर वय ५३ मये हेमलता नाईक वय ३८ साखळी, प्रज्ञा वरक वय १३ भुईपाल, अमृतधारा नाईक वय २६ पर्ये, वेदांग बहरे वय १६ भुईपाल, प्रशांती फडते वय २४ रिवण, शिल्पा गोसावी वय ३२ हरवळे, नेहाल परवार वय १७ कोपार्डे, दीक्षा गावस वय १६ मोर्ले, ईशा परवार वय १३ सालेली, गोपाल परवार वय १८ मोर्ले, ईशांत परवार वय ६ सालेली, महादेव परवार वय ४६ सालेली, ईब्राहिम कोपु वय १२ डिचोली, नमिता खांडोळकर वय १२ भुईपाल, कमलेश दवाणे वय १४ भुईपाल, विठ्ठल पावणे वय ८ भुईपाल, सीता गांवकर वय ६५ होंडा, दिप्ती पावणे वय १४ भुईपाल, प्रणाली वरक वय १४ भुईपाल, माधुरी पाटील वय २४ मये, मारीयाटा फर्नांडिस वय ४० साखळी, गायत्री गावस वय ३३ केरी, वेरोनिका फर्नांडिस वय २९ साखळी, रुपा वझे वय ३८ डिचोली, रेखा देसाई वय २९ साखळी, मुनझा शेख वय १४ भुईपाल व उदय मांद्रेकर वय ३९ साखळी. वाळपई शासकीय हॉस्पिटल रात्रपाळीला एकच डॉक्टर असल्याकारणाने व अपघात सकाळीच घडल्याने एकाच डॉक्टरावर सर्व ताण पडला पण अपघाताची माहिती डॉक्टराना मिळताच आणखीन चार डॉक्टर येऊन अपघातग्रस्तांवर उपचार सुरू केले. डॉ. विनेश गांवकर, डॉ. शाम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, डॉ. संजय गांवकर, डॉ. विदेश जल्मी यानी जखमीवर उपचार केले. तसेच जखमीचे एक्स-रे काढण्यात आले. अपघातात बस सापडल्यानंतर जखमीना रुग्णालयात आणल्यानंतर वाळपईचे नगराध्यक्ष रामदास शिरोडकर, माजी आमदार अशोक परोब, नगरसेवक धमेंद्र साळुंके, पर्ये भाजपा मंडळ अध्यक्ष गोविंद कोरगांवकर यांच्यासह अनेकानी जखमींची विचारपूस केली.