वाळपईत पावसाचे इंचांचे अर्धशतक

0
14

वाळपई येथे मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक पार केले असून, वाळपई येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 50.39 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 41.62 इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी आणि सांगे भागात मोसमी पाऊस इंचाच्या अर्धशतकाच्या जवळ येऊन ठेपला आहे. साखळी येथे 49.96 इंच आणि सांगेत 48.69 इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील दोन्ही जिल्ह्यांत मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य आहे. वाळपई, साखळी, सांगे यांच्यापाठोपाठ काणकोण येथे 45.92 इंच, मडगाव येथे 43.46 इंच, केपे येथे 41.44 इंच, फोंडा येथे 41.11 इंच, पेडणे येथे 38.55 इंच, मुरगाव येथे 37.27 इंच, म्हापसा येथे 36.61 इंच, जुने गोवे येथे 36.11 इंच, पणजी येथे 35.61 इंच आणि दाबोळी येथे 35.20 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील चार दिवस पावसाचे प्रमाण कमी होते. बुधवारी पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे. मागील चोवीस तासांत 1.68 इंच पावसाची नोंद झाली.