वाळपईतील युवकाचा नदीत बुडून मृत्यू

0
73

वाळपई (न. प्र.)
वाळपई येथील वेळुस नदीतील हळसाणाची कोंड येथे काल दुपारी बाराच्या सुमारास आंघोळीसाठी गेला असता शशांक उमेश काणेकर (वाळपई वय १७) याचा बुडुन मृत्यू झाला. तो पर्येतील भुमिका हायर सेंकडरीत अकरावीत शिकत होता.
अकराच्या सुमारास चार जणांचा गट वाळपई पासून जवळच असलेल्या दाबोस पदपुलांवरच्या वेळुस नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले. पाचही जण नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले. पण शंशाक याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. चार जणांपैकी एकाने धावत येउन वाळपई पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर वाळपई पोलीस त्या ठिकाणी गेले. पण तो बुडाला होता. वाळपई अग्निशामक दलाचे जवान व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाळपई पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी गोमेकॉ बांबोळी येथे पाठविण्यात आला. शंशाक ह्याला आईवडील व लहान बहीण आहे. शंशाक ह्याच्या आस्कमिक निधनाने काणेकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.