वारसा धोरण निर्मितीसाठी 15 सदस्यीय समिती स्थापन

0
17

राज्य सरकारकडून वारसा धोरण तयार केले जाणार आहे. राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने राज्याच्या वारसा धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एक 15 सदस्यीय देखरेख समितीची स्थापना केली आहे.
राज्याचे पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी वारसा धोरण तयार करण्याची घोषणा केलेली आहे. ही देखरेख समिती वारसा धोरणासाठी सूचना, वारसा धोरणाच्या मसुद्याचे पर्यवेक्षण आणि छाननी करणार आहे. तसेच वारसा धोरणाच्या संदर्भात तज्ञ आणि सामान्य नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि आक्षेपांचे मूल्यमापन करून वारसा धोरणाच्या कच्चा मसुद्यासाठी शिफारस करण्याचे काम करणार आहे. पुरातत्त्व शास्त्र खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये लोकसाहित्य, पर्यावरण, वारसातज्ज्ञ राजेंद्र केरकर, संवर्धन वास्तुविशारद केतक नाचिनोलकर, वारसातज्ज्ञ डॉ. पांडुरंग फळदेसाई, वारसा पर्यटनाचे तज्ज्ञ आणि गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपचे प्रतिनिधी संजीव सरदेसाई यांचा समावेश आहे. दरम्यान, नगरनियोजन खात्याने वर्ष 2018 मध्ये वारसा वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षण यावर निर्णय घेण्यासाठी वारसा धोरणाचा मसुदा निर्मितीची प्रक्रिया सुरू केली होती.