वादग्रस्त ठरलेल्या भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकाचे नाव बदलण्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जो निर्णय घेतला आहे त्याला कॉंग्रेस पक्षाच्या कायदा विभागाने हरकत घेतली आहे. हे विधेयक पूर्णपणे मागे घ्यावे अशी मागणीही यावेळी कॉंग्रेसच्या कायदा विभागातर्फे कार्लुस फेरेरा यांनी केली आहे.
फेरेरा यांनी, ह्या विधेयकाला जोरदार विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांनी ते विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून आता ह्या विधेयकाचे नाव बदलण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री का सांगत आहे असा सवाल केला.
नाव बदलून आहे तेच विधेयक पुढे आणण्याचा विचार मुख्यमंत्र्यांचा नसावा अशी शंकाही यावेळी श्री. फेरेरा यांनी व्यक्त केली.