वाणिज्य समितीवर तानावडेंची नियुक्ती

0
6

राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची संसदेच्या वाणिज्य विषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या विविध संसदीय स्थायी समित्यांची घोषणा करण्यात आली असून, या समित्या धोरणे, कायदेविषयक विधेयके इत्यादींची छाननी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वाणिज्य विषयक स्थायी समितीवर खासदार तानावडे यांचा समावेश करण्यात आला आहे.