किनारी नियमन विभागात सुरू असलेला वाईन महोत्सव दि. २६ रोजी बंद करा, या हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काशिनाथ शेट्ये यांनी पणजीच्या पोलीस निरीक्षकांना नोटीस दिली आहे. दि. १५ ऑगस्ट, दि. २६ जानेवारी व २ ऑक्टोबर हे राष्ट्रीय कोरडे दिन असल्याचे शेट्ये यांचे म्हणणे आहे. अन्य संबंधित अधिकार्यांनी वरील नोटिसा घेण्यास नकार दिला आहे. हरित लवादाच्या वरील आदेशाच्या बाबतीत सरकार आज कोणती भूमिका घेतील यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. परवा शनिवारी संध्याकाळपर्यंत हरित लवादाचा आदेश पर्यटन विकास महामंडळाला मिळालेला नाही, असे अध्यक्ष नीलेश काब्राल यांचे म्हणणे आहे.