वाइन महोत्सवावर हरित लवादाचे निर्बंध

0
84

पणजीत कालपासून सुरू झालेल्या ‘ग्रेट एक्सेपेड’ या वार्षिक वाइन महोत्सवाचा कालावधी कमी करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्याचे वृत्त आहे. प्रजासत्ताक दिन हा ‘दारूबंदी दिन’ असल्याने त्या दिवशी या महोत्सवाचे आयोजन करण्यास हरकत घेण्यात आली आहे. चार दिवस होणार असलेला हा महोत्सव आता फक्त तीन दिवस होईल. हरित लवादच्या पश्‍चिम विभागीय खंडपीठाचे न्या. व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांनी काल हा आदेश दिला. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी गोवा किनारी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीकडे सोपवण्यात आली आहे.