वांते येथे संशयास्पद मृत्यू

0
93

वांते अडवई येथे जलसिंचन खात्याच्या पंप ऑपरेटरचा मृतदेह वांते येथील पंप हाऊसमध्ये सापडला. वांते येतील पंप हाऊसमध्ये रात्रपाळी करण्यासाठी चरावणे सत्तरी येथील विठ्ठल अर्जुन गावस (५४) शनिवारी सायंकाळी घरातून गेले होते. मृतदेह पंप हाऊस मध्ये असल्याचा दूरध्वनी वाळपई पोलिसांना रविवारी सकाळी ११ वाजता आला. त्याप्रमाणे वाळपई पोलीस घटनास्थळी गेले असता विठ्ठल याचा मृतदेह त्यांना पंप हाऊस मध्ये आढळून आला. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला होता व शरीर काळे पडले होते. त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पण शवचिकित्सा अहवालात मृत्यूचे कारण देण्यात आलेले नाही. वांते सत्तरी येथील पंप हाऊस हे मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर दूर असून चालत जावे लागते.