भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा इएसपीएनच्या वर्ल्ड ङ्गेम १०० रॅकिंगमध्ये समावेश झाला आहे. इएसपीएनने जगभरातल्या अव्वल १०० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विराट कोहली आठव्या क्रमांकावर तर धोनी १३ व्या क्रमांकावर आहे. या दोघांबरोबरच भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा या यादीत ४१ व्या क्रमांकावर आहे.
खेळाडूंचा पगार, जाहिराती, सोशल मीडिया ङ्गॉलोईंग आणि गुगल सर्च पॉप्युलॅरिटी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे रॅकिंग बनविण्यात आली आहे. या रॅकिंगमध्ये फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे, तर अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स दुसर्या, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनल मेसी तिसर्या, फुटबॉलपटू नेमार चौथ्या आणि टेनिसपटू रॉजर ङ्गेडरर पाचव्या क्रमांकावर आहे.