सर्व कंपन्यांना 21 जुलैपर्यंत कार्यवाहीचे आदेश
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियााच्या विमान अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आल्यायानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक सर्व विमान कंपन्यांसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. डीजीसीएने सर्व भारतीय नोंदणीकृत विमानांच्या इंजिन फ्यूएल स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश जारी केले आहेत. तपास पूर्ण करण्याची अंतिम तारीख 21 जुलै अशी असेल.
भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था : एएआयबी) अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल शनिवारी सार्वजनिक केला होता. त्यात विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते. इंजिन 1 आणि इंजिन 2 यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर दोन्ही इंजिन बंद पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर डीजीसीएने इंजिन फ्यूएल स्विचेसच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.