‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आज सोमवारी 16 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडले जाणार नाही. यासंबंधीची दोन्ही विधेयके लोकसभेच्या सुधारित यादीतून हटवण्यात आली आहेत. यापूर्वी 13 डिसेंबरच्या कॅलेंडरमध्ये हे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता आर्थिक कामकाज पूर्ण झाल्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जाणार आहे. तथापि, लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीनंतर सरकार हे विधेयक शेवटच्या क्षणी पुरवणी यादीद्वारे सभागृहात मांडू शकते. 13 आणि 14 डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर चर्चा झाली. आतापर्यंत पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राजनाथ सिंह हे यावर बोलले आहे. राज्यसभेत आता 16 आणि 17 डिसेंबरला संविधानावर चर्चा होणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते 20 डिसेंबरला संपणार आहे.