वनखात्याकडून आजपासून राज्यातील झाडांची मोजणी

0
22

वनखात्याकडून राज्यातील झाडांची मोजणीचे काम आज दि. १८ एप्रिल २०२२ पासून सुरू करण्यात येणार आहे. झाडांची स्थानिक आणि शास्त्रीय नावांसह नोंदणी केली जाणार आहे. झाडांच्या मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यात १० पथके नियुक्त करण्यात आली असून तालुका प्रभारी म्हणून १२ वन अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांची मोजणी केली जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील झाडांची मोजणी केली जाणार आहे. हेरिटेज फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. राज्यातील जिल्हा वृक्ष प्राधिकरण निष्क्रिय असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला वृक्ष प्राधिकरणाची तीन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याचा निर्देश दिला आहे. तसेच, राज्यातील झाडांची मोजणी करण्याचा निर्देश दिला आहे. या मोजणीमुळे राज्यातील झाडांची एकूण संख्या स्पष्ट होणार आहे.