>> गिरीश चोडणकर यांचा आरोप
राज्य सरकारच्या वजन आणि माप खात्यातील निरीक्षकांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केला.
या पदाच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत या खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी साहाय्यकाला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तसेच, राजकीय नेत्यांच्या मर्जीतील अन्य तीन उमेदवारांना तशाच पद्धतीने गुण मिळाले आहेत. त्यामुळे या भरतीबाबत संशय निर्माण होत आहे. ही भरती प्रक्रिया त्वरित रद्द करावी. मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
या प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा चोडणकर यांनी दिला.