वजन आणि माप खात्याच्या अधिकार्यांनी राज्याच्या विविध भागांत काजू, बदाम आदी सुक्या फळांची विक्री करणार्या वेगवेगळ्या आस्थापनांवर काल छापे घालून सुमारे १० लाख रुपयांचा माल जप्त केला. अधिकार्यांनी दिवाळीच्या पूर्वी सासष्टी, बार्देश, तिसवाडी व इतर तालुक्यातील काजू व इतर सुक्या फळांची विक्री करणार्या दुकानांची तपासणी सुरू केली आहे.