लोकसभेने शुक्रवारी वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) प्रस्ताव स्वीकारला. या समितीत 31 सदस्य असतील. लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतील. या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे.
संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यासाठी काल लोकसभेत प्रस्ताव मांडला. रिजिजू यांनी वक्फ विधेयक 2024 लोकसभेत एक दिवस अगोदर म्हणजेच गुरुवारी मांडले होते.