लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. रावराणे

0
4

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी एका आदेशाद्वारे डॉ. उदयसिंह श्रीकांत रावराणे यांची नियुक्ती केली आहे. भारतीय राजघटनेतील कलम 316 (1) नुसार ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून पुढील सहा वर्षांसाठी अथवा त्यांचे वय 62 वर्षे होईपर्यंत असेल. दरम्यान, नियुक्तीला आक्षेप घेणारी एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. रावराणे यांची नियुक्ती ही आवश्यक ती सगळी प्रक्रिया पूर्ण न करताच करण्यात आली असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.