लोकसभा निवडणूक लढणारच : सावळ

0
13

आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले; मात्र आपण कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवणार आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. योग्य वेळी सगळे काही स्पष्ट होणार आहे असे सांगतानाच आपण निवडणूक लढवण्याची तयारी केलेली असून, उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे निश्चित, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सावळ यांनी मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर जोरदार टीका केली.