>> पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन
आपण समृद्ध भारत देशाचे नागरिक आहोत. देशाच्या संविधानानुसार सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून तो सर्वांनी बजवला पाहिजे. जे सरकार आपल्या देशाला विकसित करते, लोककल्याण, जनहित, धर्माला व संस्कृतीला जपते अशा सर्वांना आपण नेतृत्वाचा अधिकार दिला पाहिजे. भारत माझा देश आहे तर त्या देशाचा विचार करून मतदान करा असे आवाहन पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले आहे.
उद्या 7 मे रोजी गोव्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. आपल्या देशाला प्रगतीशील, विकसनशील बनवण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून आपला हातभार लावावा. ज्या श्रीरामांनी आपल्या देशाला संस्कृती दिली, ज्या श्रीकृष्णांनी आपल्याला बोध केला अशा ह्या रामकृष्णांचा हा देश आहे. हा देश श्रीरामकृष्णांचाच राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया व त्यासाठी रामराज्यासाठी सर्व गोमंतकीयांनी मतदान करावे. राष्ट्रधर्म, जनहित व स्वसंस्कृती जपणाऱ्यांना मतदान करा असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशनांद स्वामी यांनी केले आहे.