2024च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल जारी केला. 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदारांचा मतदान यादीत समावेश करण्यात आला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6 टक्के वाढ झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तरदेखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे. मतदार यादीत 2.63 कोटींहून अधिक नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 1.41 कोटी महिला मतदार आहेत. त्यांची संख्या नोंदणीकृत पुरुष मतदारांपेक्षा (1.22 कोटी) 15 टक्के अधिक आहे. मतदार डेटाबेसमध्ये सुमारे 88.35 लाख दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत.17 वर्षांवरील 10.64 लाख तरुणांनी आपली नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तीन तारखांना 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांचा समावेश आहे.