राज्यातील चार दिवशीय लॉकडाऊननंतर सोमवारपासून दैनंदिन व्यवहारांना पुन्हा सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची आस्थापने वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. राज्यातील बर्याच भागातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्या व्यावसायिकांनी सुध्दा आपला व्यवसाय बंद ठेवून लॉकडाऊनला पाठिंबा दिला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक वस्तूंची आगाऊ खरेदी करून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागले नाही.