लैंगिक छळ : मुख्य संशयिताच अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0
29

>> आयकर कार्यालयातील लैंगिक छळ प्रकरण; दोघा संशयितांना जामीन मंजूर

पाटो-पणजी येथील आयकर कार्यालयातील कनिष्ठ महिला कर्मचार्‍याच्या लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित आयकर निरीक्षक मनिंदर सिंग अट्टारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने काल फेटाळला. त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणातील अन्य दोघा संशयित आयकर निरीक्षकांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पाटो-पणजी येथील आयकर कार्यालयातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्‍याने काही दिवसांपूर्वी तीन आयकर निरीक्षकांविरोधात येथील पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तिघा आयकर निरीक्षकांविरोधात लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांही संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (४), ३५४ (ड), ५०९ व ५०६ (२) खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर संशयित फेब्रुवारीपासून सदर महिलेचा लैंगिक छळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धमकी देखील संशयितांनी दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

तक्रार दाखल होऊन गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणातील संशयित मनिंदर सिंग अट्टारी, आदित्य वर्मा आणि दीपक कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आदित्य वर्मा आणि दीपक कुमार यांना बुधवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, तर मुख्य संशयित मनिंदर सिंग अट्टारी याच्या जामीन अर्जावरील निवाडा राखून ठेवला होता. या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीवेळी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे
या प्रकरणी जामीन मंजूर केलेल्या दोघा संशयितांना पोलीस स्थानकात उपस्थित राहून चौकशीत सहकार्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे.