गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनी पोलीस स्थानकावर आल्या असता त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आारोप असलेला पोलीस अधिकारी काल गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर हजर राहिला. मात्र, यावेळी त्याने आपणावरील सर्व आरोप फेटाळून लावले. या समितीने त्यांना या विद्यार्थिनींची माफी मागावी अशी केेलेली सूचनाही त्याने अमान्य केली.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणी गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीला या प्रकरणी चौकशी करून 13 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीने सदर पोलीस अधिकाऱ्याला आपणासमोर हजर राहण्यासाठी यापूर्वी कित्येक नोटिसा पाठवल्या होत्या मात्र, त्या नोटिशींना त्याने दाद दिली नव्हती.
पीडित विद्यार्थिनींनी आपण इंटर्नशिपसाठी पोलीस स्थानकात गेले असता सदर पोलीस अधिकाऱ्याने आपणावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलेला आहे.