लेबनॉनमध्ये वॉकी-टॉकीचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू

0
5

लेबनॉनमध्ये मंगळवारी पेजरमध्ये झालेल्या स्फोटानंतर काल वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. राजधानी बेरूतमधील अनेक भागात हे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक स्फोट हिजबुल्लाह खासदार अली अम्मार यांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी झाला. 17 सप्टेंबर रोजी पेजर येथे झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला होता. लेबनॉनमधील हिजबुल्लाह लढवय्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या वॉकी-टॉकीचा वापर करतात.

लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा वॉकी-टॉकीचे स्फोट झाल्याची घटना समोर आली. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हिजबुल्लाहने वापरलेल्या काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला. ज्या ठिकाणी पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे अंतिम संस्कार केले जात होते, त्या ठिकाणीही स्फोट झाला.
हे वॉकी-टॉकी हिजबुल्लाहने सुमारे पाच महिन्यांपूर्वी खरेदी केले होते आणि त्याच वेळी पेजर देखील खरेदी केले होते. काल वॉकी टॉकीचा स्फोट होऊन अनेकजण जखमी झाले.